सांगली : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसाहेब आता तरी जरा आपल्या महालातून बाहेर या आणि जनतेचे प्रश्न काय आहेत ते जाणून घ्या” कोरोना आला मास्क लावा आणि घरात बसा,आणि पळ काढा याला वाघ म्हणत नाहीत.वाघ हा डरकाळ्या फोडत जात असतो आणि तुमच्यात वाघाचे एक ही लक्षण नाही. प्रत्येकवेळी बिळात जाऊन बसता आम्ही खरा वाघ बघायला अधिवेशनामध्ये येणार आहे.अशी घणाघाती टीका सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरती केली आहे.ते सांगलीच्या आटपाडी मध्ये बोलत होते.
शेतकरी,शेतमजूर आणि बारा बलुतेदार यांचे अनेक प्रश्न राज्यात आहेत.त्यामुळे हे अधिवेशन पूर्ण झाले पाहिजे.पण हे सरकार अधिवेशन मधून सातत्याने पळ काढत आहे.देशाच अधिवेशन महिनाभर चालतं आणि याचं पाच दिवस चालतं कारण यांना भीती वाटते यांचा भ्रष्टाचार बाहेर पडेल आणि अनेकांना मंत्री मंडळामधून बाहेर जावे लागेल.या भीतीपोटी ते अधिवेशन घेत नाहीत असा आरोपही त्यांनी राज्य सरकार वरती केला आहे.