कोऱ्हाळे बु : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बौद्ध युवक संघटना समतानगर व सोन्या बापू खोमणे युवा मंच यांच्या वतीने कोऱ्हाळे बुद्रुक या ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील जळीत कांडमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून निवड झाल्याबद्दल बारामती न्यायालयातील अँड.अमोल सोनवणे व एन.डी.एम.जे संघटनेचे राज्य सचिव वैभव गीते यांनी अनुसूचित जातीतील पीडित १७ कुटूंबियांचे पुनवर्सन करून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल वैभव गिते यांचा संघटनेच्या वतीने श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार समारंभ करण्यात आला.
ऍड.अमोल सोनवणे यांची उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील जळीत कांड प्रकरणासाठी विशेष सरकारी वकील नियुक्ती केल्याने सोनावणे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.यावेळी सजीव संरक्षण आणि जागृती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या आदिवासी हक्क अधिकार या माहिती पुस्तकीचे विशेष सरकारी वकील ऍड.अमोल सोनवणे,ऍड.बापू शिलवंत,वैभव गीते,सुनिल धीवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
यावेळी या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे,ऍड. बापूसाहेब शिलवंत,सजीव संरक्षण आणि जागृती बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भालचंद्र महाडिकराजे सुनिल भगत,सुनिल धिवार,रणजित मोरे,रविंद्र खोमणे,लता नलावडे,नाना मदने,विश्वास भोसले,योगेश भोसले, हेमंत गडकरी,अनिकेत मोहिते,अँड स्वप्निल खरात,सोमनाथ लोणकर,अमोल गायकवाड,संतोष डुबल,संजय साळवे,उमेश गायकवाड इत्यादी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन महेश चव्हाण,प्रतिक चव्हाण,विश्वजित चव्हाण, सोमनाथ जाधव व सोन्या बापू युवा मंचच्या युवकांनी केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोसले यांनी केले,तर सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.