दौंडचे आमदार राहुल कुल यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र…पुणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई देण्याची केली मागणी..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

पुणे जिल्ह्यात १ व २ डिसेंबर कालावधीत एकूण ७८५ मिली लिटर पाऊस पडला असून, यामध्ये थंडीमुळे दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात सुमारे २००० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू झालेला आहे. हा आकडा प्रथमदर्शनी असून जिल्ह्यातील काही भागात अद्याप पंचनामे सुरु असल्यामुळे नुकसानीचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून,काही ठिकाणी घराच्या पडझडी देखील झालेल्या आहेत. कोराना सारख्या महाभीषण आपत्तीचा सामना करीत, असताना सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हवालदिल झालेला आहे.

त्यातच नव्याने उभा राहिलेल्या अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे आणखीच अडचणीत सापडला आहे.त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना तातडीने मिळणे आवश्यक आहे.त्यामुळे १ व २ डिसेंबर २०२१ या कालावधीत पुणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व बाधित नागरिकांना तात्काळ भरपाई मिळावी अशी मागणी करणारे पत्र दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे. यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार, आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार,
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्याकडे देखील मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *