Big Breaking : सहकार क्षेत्रातील ढाण्या वाघ,छत्रपती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष मारुतीराव चोपडे यांचे निधन..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील ढेकळवाडी येथील असणाऱ्या मारुतराव चोपडे यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.त्यांनी १९७३- १९७८ कालावधीत भवानीनगरच्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा अविरतपणे सांभाळली होती.तसेच चोपडे यांनी कारखान्याच्या संचालक मंडळामध्ये त्यांनी तब्बल चाळीस वर्षे संचालक म्हणून काम पाहत त्यांनी सहकारावर अधिराज्य गाजवले.

तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदा सह निरा कॅनल सोसायटीच्या अध्यक्षपदी व संचालक मंडळांमध्ये ही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला.त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द देखील सर्वदूर परिचित होती.त्यांच्या पाठीमागे पत्नी, पाच मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *