शिकार प्रकरणार साताऱ्याच्या दोघांचा समावेश..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुक्यातील पणदरे वनपरिक्षेत्रात एका चिंकारा जातीच्या हरणासह पाच सशांची शिकार झाल्याची घटना समोर आली.याप्रकरणी बारामती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी
वैभव सुभाष घाडगे (वय.२६), संग्राम सुनील माने (वय.२७) रा. दोघेही सातारा रोड तर सुनिल मारुती शिंदे (वय.४०), दादा रामभाऊ पवार (वय ३७ रा. आबाजीनगर,पणदरे) अशा
पाच जणांवर वन्यजीव संरक्षण गुन्हा दाखल केला आहे,या शिकार प्रकरणातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला असून,चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबाबत वनविभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास बारामती वनपरिक्षेत्रातील कर्मचारी हे पणदरे परिक्षेत्रामध्ये रात्रीची गस्त घालत असताना वनविभागात बॅट-यांच्या हालचाली जाणवल्याने, कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी छापेमारी केली.त्यावेळी संबंधित पाच आरोपी एक चिंकारा जातीचे हरीण आणि पाच सशांची शिकार करताना निदर्शनास आले.
वनविभाग अधिकाऱ्यांची चाहूल लागताच यातील एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला मात्र,इतर चौघांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.मृत हरणाचे शवविच्छेदन करण्यात आले असून,तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.पुण्याचे उपवनसंरक्षक मयुर बोठे यांनी घटनास्थळाला भेट दिली.चौघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून,पुढील तपास बारामती वनविभाग करीत आहे.