बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती शहरामध्ये गरजूंना आलेला रेशनिंगचा तांदूळ संगनमताने खुल्या बाजारात विकणाऱ्या वसंत सोमनाथ पोटे (रा.खाटीक गल्ली,बारामती ) वैभव भारत दनाने ( रा. तांदुळवाडी,बारामती ) या दोघांवर पोलीस नाईक दशरथ कोळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३,७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी त्याच्या ताब्यातील गाडीसह ३० पोटी तांदूळ असा तब्बल १ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार स्वस्त धान्य दुकानात गरजूंना वितरित होणारा तांदूळ हा सदर संशयित आरोपींनी खरेदी करून तो खुल्या बाजारात चढया भावाने विक्रीकरिता खाजगी पोत्यामध्ये भरून विनापरवाना मालवाहतूक गाडी क्र. MH.42 AQ 5805 TATA ACE गाडीमध्ये रेशनिंगचे मालाची विक्री करण्याचे उदेशाने घेवून जात असल्याची माहिती मिळाली असता,पोलिसांना त्यांना ताब्यात घेतले असता,यामध्ये १८ हजार रुपये किंमतीची १२०० किलो वजनाची तांदूळाने भरलेली एकूण ३० पोती व खाकी रंगाची सरकारी शिक्का असलेली ५ पोती,१ लाख ५० हजारांची मालवाहतूक करणारी फिक्कट पिवळया रंगाची गाडी असा एकूण १ लाख ६८ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक पोलीस,पोलीस उपनिरीक्षक सागर ढाकणे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर पोलीस नाईक खांडेकर,पोलीस नाईक,तुषार चव्हाण,पवार यांनी केलेली आहे.