BREAKING NEWS : बनावट कागदपत्रांद्वारे १३ कोटी ६४ लाखांची फसवणूक, १८ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!!


महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..

एम.आय.डी.सी. येथे असणाऱ्या युटोपीया कंपनीची बनावट कागदपत्रे बनवून कंपनीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.तसेच कंपनीच्या सामुगीची चोरी करून नियमांचा भंग केल्याने १८ जणांविरूद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,फिर्यादी प्रसन्न आनंदराव देशमुख,वय.४८ वर्ष (रा.आर्मी ऑफिस कॉलनी सदर बझार) यांनी १९९७ मध्ये युटोपीया ऑटोमिशन कंपनीची स्थापना केली.सन २००७ व २००८ मध्ये प्रसन्न यांच्यासोबत जुनी ओळख असणारे अविनाश साखळकर यांची भेट झाली.कंपनीच्या पर्चेसचा अनुभव चांगला आहे,असे सांगत त्यांनी विश्वास संपादन केला.त्यानंतर गौरी देशमुख,महेश साखळकर संदीप बोरसे हे कंपनीचे कामकाज पाहू लागले. यावेळी औषध बनवणाऱ्या कंपन्यांना लागणाया मशीन व मशीनचे सुट्टे भाग बनविण्याचे काम सुरू केले.

या कामात संशयित महेश साखळकर,तन्मय रणसिंग,अनिरूद्ध देसाई,अभय सपाटे,तुषार कदम,समीर वाघ,नितीन चिकुर्डे अनिकेत बोबडे,धनजंय कुलकर्णी,सुनंदा कुलकर्णी, देवदत्त काणे,सार्थक पालकर,राहूल गोलवीकर,किरण पालकर,जागृती साखळकर,शुभम यादव,विकास मोरे,दिनेश फलक व इतर कर्मचारी यांनी संगमताने बनावट कागदपत्रे बनवली.तसेच कंपनीची वेळोवेळी १३ कोटी ६४ लाख ७१ हजार ८७६ ची आर्थिक फसवणूक केली.तसेच कंपनीच्या सामुग्रीची चोरी केली आहे. कंपनीने घालुन दिलेल्या नियमांचा भंग केला आहे.यामुळे यांच्या विरूद्ध प्रसन्न देशमुख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *