Big Breaking : मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या वकील महिलेविरोधात तिच्या गावातील १६५ गावकऱ्यांनी केला गृहमंत्र्यांना अर्ज, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रास देण्याची वकील महिलेला सवय..!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

पुणे जिल्ह्यातील एका महिला वकिलाने मुंबई मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती महिलेच्या आत्महत्येच्या प्रयत्नांचा प्रकार हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून तो सोशल मीडियावर व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे,या अनुषंगाने या महिलेला मारिन ड्राईव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पुणे जिल्ह्यातील दौंड उपविभागातील पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांनी आपल्यासोबत छेडछाड केल्याचा आरोप या महिलेने केला असून, त्याची तक्रार देऊनही या अधिकाऱ्यांवर कारवाई होत, वारंवार वरिष्ठांना भेटूनही आपली दाद घेतली जात नसल्याने आपण हे पाऊल उचलले असल्याचे महिलेचे म्हणणे आहे.

असे असताना दुसरीकडे मात्र मंत्रालयासमोर आत्मदहना प्रयत्न करणाऱ्या वकील महिलेच्या विरोधात ती राहत असलेल्या शिरूर तालुक्यातील पाबळ गावच्या गावकऱ्यांनी महिले विरोधात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना १६५ गावकऱ्यांच्या सह्या असेलेला तक्रारी अर्ज दिला आहे या तक्रारी अर्जामध्ये गावकऱ्यांनी म्हणटले आहे की,ही वकील महिला नेहमी प्रतिष्ठित व्यक्ती आणि अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करत असल्याचा आरोप केला आहे.या वकिल महिलेला ब्लॅकमेलिंग आणि मानसिक त्रास देऊन अधिकाऱ्यांना त्रास देण्याची सवय आहे,अशा कामांमुळे गावाची प्रतिष्ठा आणि नाव खराब होत आहे असे पत्रात म्हंटले आहे त्यामुळे त्या वकील महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात करण्यात यावी असा अर्ज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या महिलेने यापूर्वीही एक ते दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.तसेच यापूर्वी देखील दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि दौंड पोलिस ठाण्यात येऊन पोलिसांना अरेरावी करून गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी दबाव टाकत होत्या,मात्र पोलिसांनी नकार दिल्यानंतर वकील महिला यांनी अरेरावी केली त्यामुळे वकील महिलेच्या विरोधात ३५३ दाखल केले तो दाखल गुन्हा मागे घ्यावा म्हणून मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.यामुळे आता पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.कारण हाताची पाचही बोटे सारखी नसतात,त्याचप्रमाणे सगळे पोलिस अधिकारी वाईटही नसतात,त्यामुळे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना नेहमीच अशा प्रकारांना सामोरे जावे लागते.अशी चर्चा जोरात सुरू असल्याने,पोलीस प्रशासन सदर प्रकरणाची चौकशी करून जो दोषी आढळले त्याच्यावर योग्य ती कायदेशीत कारवाई करणार का हे पाहणे देखील औत्सुक्याचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *