मोठी बातमी : हातावरील टॅटूवरून बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला शहर पोलिसांनी केले जेरबंद..!!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमराई परिसरातील एका पीडित अल्पवयीन मुलीशी मोरगाव रोडवर असणाऱ्या शाळेकडे जाताना ओळख करून तिला फूस लावून शारिरिक संबंध प्रस्थापित करणाऱ्या आरोपी सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ,वय.२५ ( रा.गोजुबावी,ता बारामती,जि.पुणे ) सध्या रा.लक्ष्मीनगर,बारामती शहर ) याला ताब्यात घेत त्याच्यावर पीडितेच्या आईच्या जबाबावरून आरोपीवर भादवी कलम ३७६ व पॉस्को कायद्याप्रमाणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार,पुण्यातील ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीची माहिती शहर पोलिसांना मिळल्याणानंतर,शहर पोलिसांनी ससून हॉस्पिटलमध्ये जात,त्या पीडित मुलीच्या आईचा जबाब घेतला,त्यांनी दिलेल्या जबाबानुसार,पीडिता ही मोरगाव रोडवर असणाऱ्या शाळेकडे जात असताना तिची या मुलाबरोबर ओळख झाली होती,दोन ते तीन वेळा ते दोघे एकमेकांना भेटले होते.याच ओळखीचा फायदा घेत या आरोपीने त्या मुलीला फूस लावत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते,त्यातून ती पीडिता गर्भवती राहिली होती,चार महिन्यांपासून तिला मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने तिला विचारल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला, समजात बदनामी होईल या भीतीने पीडितेच्या आईने पीडितेला पुण्यातील रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी आणले असता,पीडितेला त्या मुलाचे नाव विचारले असता,तिला नाव पत्ता माहीत नसल्याचे सांगितले,मात्र त्या मुलाच्या हातावर बदाम व सागर असे गोंदलेले होते ह्या जबाबावरून अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याच अनुषंगाने शहर पोलीस तपास करत असताना,पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा शहरातील लक्ष्मीनगर परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली असता,त्याला ताब्यात घेतले असता,त्याला पोलीसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबुल केला. पीडितेने सांगितल्याप्रमाणे त्याच्या हातावर टॅटू व बदाम मिळून आला.आरोपीवर गुन्हा दाखल करून पीडित मुलीचे डीएनए तसेच आरोपीचे डीएनए पडताळणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. शहर पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासामुळे आरोपीला शिक्षा करण्यासाठी मोठा उपयुक्त पुरावा ठरणार आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडीक,पोलीस उपनिरीक्षक वाघमोडे,पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर,तुषार चव्हाण,मनोज पवार,कल्याण खांडेकर,बंडू कोठे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *