राज्यांनी अलर्ट राहण्याचा केंद्र सरकारचा ईशारा
मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
द.अफ्रीकेत आढ़ळलेल्या नव्या ओमिक्रॉंन व्हेरियंटमुळे राज्यात नवे नियम लागु करण्यात आले आहेत.आपल्या राज्यात एकही याचा रुग्ण आढळला नसला तरी पुन्हा एकदा कोरोनाचे नियम लागु करण्यात आले असून,राज्य सरकार याबाबत हायआलर्ट वर गेलेल आहे केंद्र सरकारने सुद्धा ओमोक्रॉंनबद्दल सर्व राज्यांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.परदेशातुन येणाऱ्या आणि विशेष द.अफ्रीकातुन येणाऱ्या प्रवाशांबाबत खबरदारी घ्यावी असे केंद्राने काळविले आहे.
अशी असेल नियमावली :
➡️ सार्वजनिक वाहतुकीत केवळ पूर्ण लसीकरण वाल्यांनाच परवानगी
➡️ मॉल ,सभागृह, कार्यक्रम या ठिकाणी लसीचे दोन डोस असलेले यानाच प्रवेश
➡️ प्रवास करताना लसिकरण प्रमाणपत्र आणि यूनिवर्सल पास तसेच फ़ोटो ओळखपत्र बंधनकारक
➡️रिक्षा,टैक्सी,बस,क्याबमधे लसीचे दोन डोस असलेल्यानाच प्रवास करता येणार
➡️ सार्वजनिक अथवा खासगी वाहनं चालक आणि प्रवासी याना लसीकरण बंधनकारक
➡️महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना पूर्ण लसीकरण असलेले प्रमाणपत्र किवा प्रवासाच्या ७२ तास आधिच RT-PCR चाचणी रिपोर्ट देणे बंधनकारक
➡️ सिनेमा हॉल,लग्नाचे हॉल,सभागृह याठिकाणी क्षमतेच्या ५०% टक्के लोकांनाच उपस्थित रहता येणार
➡️ मास्क घातला नसेल तर ५०० रुपये दंड आकारला जाईल
➡️ दुकानात जाताना ग्राहकाने मास्क न घतल्यास दूकानदाराला १० हजारांचा दंड
➡️ मॉलमध्ये विनामास्क असल्यास मालकाला ५० हजारांचा दंड
➡️ भारत न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी २५ % लोकांनाच उपस्थितीची परवानगी
केंद्र सरकारन सर्व राज्यांना हाय अलर्ट राहण्याचे निर्देश दिले असून,सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशाची तपासणी करा.दक्षिण अफ्रिका, हॉंगकॉंग मधून येणाऱ्या प्रवाशांची साक्रीनिग करा केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिले आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. द.अफ्रीकेतुन येणाऱ्या विमानांना बंधी घातली आहे.नवा व्हेरियंट डेल्टापेक्षाही घातक आहे,असं मत नोंदवण्यात येत आहे.त्यामुळे राज्यात याचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.