बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांना मिळालेल्या माहितीनुसार,बारामती तालुक्यातील गुणवडी मधील
पोतराजाच्या ११ वर्षाच्या मुलाचा विवाह (गेनमाळ ) देवीसोबत बांधण्याचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मिळाली होती.देवदासी विषयी काम करत असल्यामूळे गेनमाळ म्हणजे देवीबरोबर लग्न लावणे हे माहीत असल्यामुळे तसेच एखाद्या महिलेला मुल होत नाही तेव्हा ते देवीला नवस बोलतात मुल होईल ते तुला अर्पण करीन.अशा मुला मुलीचा विवाह देवी बरोबर लावुन त्यांना देवीला सोडले जाते.एका छोट्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न होता.
बारामतीला फोन करून याबाबत संपुर्ण माहीती घेत याची संपूर्ण माहिती बाल जिल्हा संरक्षण अधिकारी परमानंद सरांनाही याबाबत माहीती दिली.त्यांनीही लगेच पोलीस स्टेशनशी संपर्क केला.शहर पोलिसांनी मुलाच्या आई वडिलांना,आजीला बोलावून घेतले.गेनमाळबाबत त्यांना विचारले असता त्यांनी तो जावळाचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले.पोलिसांनी आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाल संरक्षण हक्क कायदा तसेच इतर कायद्याबाबत माहीती दिली.तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात आले.त्यानुसार मुलाच्या आई वडिलांनी “मुलांचे शिक्षण करीन तसेच त्यांचे देवी बरोबर लग्न लावणार नाही”असे आश्वासन दिले.त्यानंतर पोलिसांनी त्यांचे जबाब लिहुन घेतले.त्यांच्याही मनातील सर्व शंका दुर करण्यास अंनिसच्या कार्यकर्ते यशस्वी झाले होते.
यामध्ये पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते,बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,बाल संरक्षण अधिकारी परमानंद सर,गुनवडी गावचे पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, अंनिसचे बारामती शाखेचे कार्यकर्ते विपुल पाटील,रंगनाथ नेवसे,भारत विठ्ठलदास,हरिभाऊ हिंगसे,दिनेंश आदलिंगे,तुकाराम कांबळे, बाळकृष्ण भापकर,विशाल सरोदे विकास घाडगे,तुषार जानकर यांचे या प्रकरणात मोलाचे सहकार्य लाभल्याचे अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांनी सांगितले.