बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुक्यात अवैध धंदे बंद करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभेत आदेश केल्यानंतर बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, याच अनुषंगाने बारामती तालुक्यातील सोनगाव येथे अवैद्य हातभट्टी विक्री होत असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली होती या अनुषंगाने दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेले असता,मयत मंगलेश भोसले हा पोलिसांच्या भीतीपोटी पळून जात असताना,नदीत पडून दमछाक झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांनीच मंगलेश भोसले यांचा याला मारल असल्याचे त्याच्या कुटुंबियांकडून बोलले जात आहे.सदर प्रकरणावेळी घटनास्थळी हजर असणारी प्रत्यक्षदर्शणींनी दिलेल्या माहितीनुसार हात भट्टी वरती छापा टाकण्यासाठी आलेल्या पोलिसांनीच मंगलेश भोसले याला मारले असल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहताच मयत मंगलेश भोसले हा नदी पात्राकडे पळून जाऊ लागला पोलिसांनी देखील त्याचा पाठलाग केला व पाठलाग करताना पोलिसांनी दगड मारल्याने मंगलेश नदीच्या पाण्यात पडला व पाण्यात पडून त्याची दमछाक झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप घटनास्थळी हजर असलेल्या प्रत्यक्षदर्शनींनी केला आहे. तसेच मयताचा भाऊ उपदेश भोसले हा लिमटेक येथील एका शिक्षक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यालादेखील एका बड्या नेत्याने आपल्या बंगल्यावर बोलवत सदर प्रकरण थांबवण्याचे सांगितले.तसेच मयताच्या कुटुंबातील एकाला नोकरीला लावतो असे आश्वासन देत सदर प्रकरण दाबल्याचा चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.
तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दारू अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या दोन ते तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर येथील जमावाने हल्ला केला असून यामध्ये दोन ते तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.मात्र यामध्ये जखमी झाले पोलीस कर्मचारी यांनी नुकताच काल रात्री महिला शासकीय रुग्णालयातून डिस्चार्ज घेतला आहे यामुळे या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचारी जर गंभीर जखमी असतील तर त्यांना दोन दिवसात डिस्चार्ज मिळतो कसा काय असा प्रश्न देखील आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
यामध्ये भोसले याच्या नातेवाईकांचे पोलिसांवर गंभीर आरोप होत असून याबाबत अद्यापही त्यांची फिर्याद दाखल नाही कालच मयताची बॉडी ताब्यात घेत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला,यामुळे आता पारधी समाजातील काही प्रमुख अनुसूचित जमाती आयोगाकडे दाखल करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तसेच या प्रमुखांकडून सदर प्रकरणाची केंद्रीय यंत्रांद्वारे सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे यातूनच जय भीम चित्रपटातील कथानकाप्रमाणे बारामती तालुक्यातील सोनगाव मध्ये त्याची पुनरावृत्ती झाली आहे की काय अशी चर्चा देखील चौका चौकात रंगू लागली आहे.