भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी ऊस वाहतूक वाहनांमुळे अपघाताचे जे प्रमाण वाढत आहे,हे लक्षात घेत यावर उपाययोजना म्हणून शेठफळगडे परिसरात असणाऱ्या बारामती ऍग्रो साखर कारखाना या ठिकाणी सकाळी १० ते १०.४० या दरम्यान ट्रॅक्टर वाहनचालकांची कार्यशाळा आयोजित केली होती.कारखाना चालू झाला की ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या वाढते.
यामध्ये ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांमधून ही ऊस वाहतूक होते परंतु बऱ्याच वेळा वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळताना दिसून येत नाहीत,त्यामुळे गंभीर अपघातांना सामोरे जावे लागते यातून खूप जणांचा जीव सुद्धा जातो हे लक्षात घेता भिगवण पोलीस स्टेशन हद्द व परिसरातून परिसरातून ऊस वाहतूक मोठया प्रमाणावर होत असते.इथून पुढे ऊस वाहतुक ट्रॅक्टरमुळे अपघात होऊ नयेत यासाठी बारामती ऍग्रो साखर कारखाना येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, कारखाण्याचे सीईओ जठार साहेब,कृषी अधिकारी संदीप चाकणे यांनी स्वत: ऊस वाहतूक ट्रॅक्टर वाहनांना रिफ्लेक्टर बसविले.यामुळे लांबूनच पुढे ऊस वाहतुकीचे वाहन आहे हे लक्षात येऊन पुढील अपघात होऊ नये व कोणाला आपला नाहक जीव गमवावा लागू नये हा यामागचा मुख्य हेतू होता,हा अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आज पार पडला