बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गुन्हेगार अग्नी शास्त्राचा वापर करतात किंवा जवळ बाळगतात याबाबत तीव्र मोहीम घेण्याबाबत वेळोवेळी बैठकांमध्ये तसेच सोशल मीडिया मार्फत पोलिसांना आदेश दिले असता,बारामती शहरातील पाटस रोडशेजारील हॉटेल जवळ गावठी पिस्टल बाळगणाऱ्या प्रताप अमरसिंग पवार,वय.२१ वर्ष ( रा.बागमळा,जि.खंडवा,मध्य प्रदेश ) सध्या रा.महादेवमळा, पाटस रिंगरोड याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,पाटस रिंग रोड जवळ असणाऱ्या हॉटेल सुरंजन या हॉटेल जवळ आरोपी प्रताप पवार हा गावठी पिस्तूल बाळगत असल्याची माहिती मिळाली होती,त्यानुसार सापळा रचत त्याला ताब्यात घेतले असता, त्याच्या ताब्यातील एक गावठी बनावटीचे पिस्टल व दोन ७.६५ ची जिवंत काडतुसे असा पंचवीस हजारांचा मुद्देमाल मिळून आला.
हा आरोपी हा मूळ मध्यप्रदेश येथील असल्याने त्याने तिथूनच ते हत्यार आणल्याचे तपासात कबूल केले.त्यांनी आणखी कुणाला आहे हत्यार विक्री केले आहे का ? तो लेबर लोकांना धाक दाखविण्यासाठी याचा वापर करत का ? याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत.ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक,पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील,पोलीस नाईक दशरथ कोळेकर,कल्याण खांडेकर,तुषार चव्हाण,मनोज पवार,अभि कांबळे यांच्या पथकाने केली आहे.