मोरगाव व माळेगाव येथे संविधान दिन उत्साहात साजरा..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

आज संविधान दिनाच्या निमित्ताने मोरगाव येथील सिद्धार्थ नगर बौद्ध विहारात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते.संविधान दिनाच्या निमित्ताने बौद्ध विहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध,विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महापुरुषांच्या प्रतिमाचे तसेच संविधान प्रतिचे पुजन मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांच्या हस्ते करुन संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन झाले याप्रसंगी मोरगावच्या माजी सरपंच भारतीताई गायकवाड, ग्रामसेवक मोरेश्वर गाडे,पत्रकार समिर गायकवाड,प्रशांत गायकवाड, यशोदिप गायकवाड, संजीवनी गायकवाड, जयश्री गायकवाड व इतर समाज बांधव उपस्थित होते तसेच सदर कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत व सिद्धार्थ युवक संघटना यांनी केले .

माळेगावातही संविधान दिन साजरा…

भारतीय संविधान जगातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ असून त्याची घरोघरी पारायणे झाली पाहिजेत असे प्रतिपादन तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी केले. संविधान प्रती व खाऊ वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने भारतीय संविधान दिन एस.एस.एम.हायस्कुल व ज्यु कॉलेज येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यानंतर संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य संजय भोसले,डॉ.निलकंठ ढोणे, माळेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी स्मिता काळे,माजी सरपंच जयदीप तावरे,प्राचार्य दत्तात्रय धुमाळ, अनिल दणाणे,प्रा.गणेश खरात, अजित आत्तार,लक्ष्मण भोसले,दत्तात्रय सोनवणे,सोनाली शहा,डॉ.कल्याणी सारफळे आदी उपस्थित होते.

यावेळी परफेक्ट महिला पोलिस अकॅडमी,एम.बी.ए कॉलेज प्राथमिक आरोग्य केंद्र, महिला बचत गट यांना मान्यवरांच्या हस्ते संविधानप्रती देण्यात आल्या.तसेच बसपाचे महासचिव रोहित लोंढे यांनी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन योगेश भोसले,विश्वास भोसले, दादा सोनवणे,निहाल भोसले, संग्राम भोसले यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश भोसले तर आभार प्रकाश धुमाळ यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *