क्राईम बातमी :बारामती शहरात वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱ्या महिला एजंट वर कारवाई…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती शहरातील पाटस रोडशेजारील चिमनशहामळा या परिसरात असणाऱ्या एका लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे,याप्रकरणी पोलीस हवालदार अमृता भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रुई परिसरातील बयाजीनगर येथील महिला दलालावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तिला ताब्यात घेत,तिच्या ताब्यातील एका २२ वर्षीय पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी चार्ज घेतल्यापासून अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उठवला आहे, याच अनुषंगाने कारवाई करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिल्वर ज्युबिली हॉस्पिटलसमोर असणाऱ्या चिमणशहामळा येथे असणाऱ्या सुविधा लॉजवर एक महिला एजंट पैसे घेऊन मुली पुरवण्याचा धंदा करते अशी माहिती मिळाली असता,कारवाईसाठी शहर पोलिसांना कळविले असता,शहर पोलिसांनी एका बोगस पंटर पाठवून,महिलेकडे पाठवले असता,तिने दीड हजार रुपये घेऊन त्याला महिला पुरवण्या बाबत तयारी दर्शवली व त्याला बारामती शहरातील लॉजवर घेऊन जाण्याचे ठरले.याच वेळेस पोलिसांनी पंचासमोर छापा मारला असता,महिलेला ताब्यात घेत,तिच्यासोबत असणाऱ्या एका पीडित युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे.या पीडित महिलेला प्रेरणा वसतिगृहात ठेवण्यात आले.यापुढे जर अशा प्रकारे लॉज मालकाने याबाबत खबरदारी घ्यावी अन्यथा लॉजवर सुद्धा कारवाई करण्यात येईल अशा ईशारा शहर पोलिसांकडून देण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे,पोलीस महिला कर्मचारी अमृता भोईटे,लता हिंगणे,पोलीस नाईक अजित राऊत,मनोज पवार,राहुल लाळगे यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *