मोठी बातमी : “वर्दी मधील देव माणूस” व्हाट्स अँपवर ट्रेंड सुरू…पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या बदलीच्या बातमीने पोलीस दलात प्रचंड अस्वस्थता झाल्याच्या चर्चेला उधाण..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची राज्याचे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पोलिस दलातील कनिष्ठ,वरिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी,अधिकाऱ्यांसाठी अतिशय चांगले निर्णय घेतले आहेत तसेच पोलीस दलाची प्रतिमा उंचावण्याचे काम देखील त्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणावर झाले आहे.संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत.

मात्र कालपासून व्हायरल झालेल्या बातमीमुळे पोलिस दलामध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली दिसून येत आहे आणि याच अनुषंगाने व्हाट्सअप वर कॅप्शन “वर्दी मधील देव माणूस” हा ट्रेंड सुरू झाला आहे यातूनच पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे संजय पांडे यांच्यावर असणारी प्रेम दिसून येत आहेत,संजय पांडे हे कर्तव्यदक्ष अधिकारी असल्याने त्यांची पोलीस महासंचालक या पदावर रिटायरमेंट व्हावी अशी पोलिस दलातील अधिकार्‍यांची व कर्मचार्‍यांची इच्छा दिसून येत आहे.तसेच व्हाट्स अँपवर खरा माणूस# व्यवस्थेला कधी पटणारच नाही..#व्यवस्था त्याचा# बळी# घेतेच…मग ते तुकाराम मुंडे असो किंवा संजय पांडे साहेब असो..

We Support_Mr.Sanjay_Panday_sir असा ट्रेंड देखील मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. यामुळे आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याकडे गांभीर्याने पाहणार का हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.मात्र संजय पांडे यांच्या बदलीची चर्चा जनसामान्यांमध्ये देखील कुतूहल निर्माण करत आहे.महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक संजय पांडे या पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहे. मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या पत्रव्यवहाराला आता आयोगाने उत्तर दिले आहे. पांडे यांच्या नावावर फुली मारण्यात आलेली आहे.मात्र जर आयोगाच्या शिफारसी मंजूर न करता संजय पांडे यांनाच पदावर कायम ठेवल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.त्यामुळे आता संजय पांडे यांच्या बदली संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *