महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्र नव्हे तर,जगभरात कोरोना महामारीने थैमान घातले होते, याच पार्श्वभूमीवर पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी कोविड महामारीमध्ये आपल्या मतदार संघात कोविड सेंटर उभारत नवा आदर्श निर्माण केला होता,चोवीस चोवीस तास स्वतः कोविड सेंटरमध्ये मुक्काम करत रुग्णांची सेवा करत होते,त्यांच्या या कामाचे कौतुक तमाम महाराष्ट्रातील जनतेने केलेले होते,आणि याच पार्श्वभूमीवर आमदार निलेश लंके यांनी एक सामाजिक उपक्रम राबविण्याचे धोरण हातात घेतले असून, कोरोना महामारी दरम्यान आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे.
मुला-मुलीच्या लग्नात अनेक वधूवर-पिता कर्जबाजारी होतात,ही बाब लक्षात घेत,अनेक गोरगरीब व गरजूंना आधार मिळावा यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.या सामुदायिक विवाह
सोहळ्यास राज्यातील अनेक दिग्गज हजेरी लावणार आहेत. कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यांच्यापुढे मुलींच्या लग्नाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांच्यासाठी नीलेश लंके प्रतिष्ठान धावून आले आहे.तब्बल १०१ विवाह शाही पद्धतीने अवघ्या एका रुपयात लावले जाणार आहेत.हा शाही विवाहसोहळा १० मार्चला होणार आहे.यात सहभागी होणाऱ्या वधू-वरांचा विवाह शाही पद्धतीने लावण्यात येणार आहे.हा विवाह सोहळा अवघ्या १ रुपयांत लावण्यात येणार आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे कन्यादान करणार आहेत,अशी माहिती आमदार लंके यांनी दिली.