मोठी बातमी : राज्य सरकार चोरांसारखं का वागतंय हे कळत नाही ? शरद पवार आणि अनिल परब भेटीवरून गोपीचंद पडळकरांचा सवाल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या भेटेवर भाष्य करताना,गोपीचंद पडळकर म्हणले की,सरकारकडून या बैठकीसाठी कोणी अधिकृत बोलत नाही.शरद पवार यांच्या कडे कोणतंच खातं नाही. तरी त्यांच्याकडे बैठक का ? असा रोखठोक सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. शरद पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक झाल्याचं कळालं. सरकारकडून या बैठकीसाठी कोणी अधिकृत बोलत नाही शरद पवार यांच्याकडे कोणतेही नसताना,तरी त्यांच्याबरोबर बैठकांचा फार्स का ? सरकारची भूमिका नेमकी काय आहे ?

गेल्या १३ दिवसांपासून आम्ही भूमिका मांडत आहोत.सरकार चोरासारखं का वागत आहे हे कळत नाही.एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही,तर सरकारची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे.सरकारने कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे,”असे पडळकर म्हणाले. सरकारने कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी आझाद मैदानात यावं तसेच पुढे बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या दिशेबद्दल भाष्य केलं असून, कर्मचाऱ्यांची जी भूमिका असणार आहे तीच आमची भूमिका असेल.सरकारने कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी आझाद मैदानात यावं,आम्ही तुम्हांला सहकार्य करू.हा संप संघटनाविरहित आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेला तिलांजली दिली आहे.असे गोपीचंद पडळकर म्हणाले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आज परब आणि पवार यांच्यात बैठक झाली.या बैठकीबाबत बोलताना पडळकर यांनी वरील वक्तव्य केले.

दरम्यान परिवहन अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की,आजच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यातील कोणताही मुद्दा आता सांगण्यासारखा नाही.त्यावर
अभ्यास करुनच निर्णय घेतला जाईल.कर्मचाऱ्यांचं समाधान कसं करता येईल,यावर या बैठकीत चर्चा झाली.कर्मचारी आणि प्रवासी या दोघांच्याही सोयीचा पर्याय काढला जाईल. वेगवेगळे मार्ग आहेत.त्या सगळ्यांवर चर्चा नाही.निश्चित कुठल्याही निर्णयावर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नाही,
असंही पडळकर म्हणाले. तसंच वेतनवाढीचा प्रश्नही चर्चिला गेला.अन्य राज्यांचा आणि आपल्या राज्यातील पगार यावर चर्चा झाल्याची माहिती परबांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *