दौंड बातमी : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या हक्कांसाठी दौंड येथे एकदिवसीय धरणे आंदोलन…!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

न्यायालयाने दिलेल्या ५% आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करावे तसेच इतर सर्व मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात. यासाठी दौंड तालुक्याचे वतीने दौंड तहसील कचेरी या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आले, दरम्यान मुस्लिम समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला.दौंड तहसील कर्यालाचे नायब तहसीलदार नरूटे मॅडम व धांडोरे साहेब यांनी निवेदन स्वीकारले.यामध्ये पक्षाने जाहीर केलेल्या सहा मागण्या तसेच मुस्लिम समाजाच्या वक्फ बोर्डाच्या जमिनीवर अनधिकृतरित्या कब्जा करण्यात आलेला आहे,हा कब्जा उठून या जमिनीचा उपयोग मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी करावा.अशा मागण्या करण्यात आल्या.

तसेच या आंदोलनादरम्यान दौंड तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,यावेळी ते म्हणाले,की मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी अनेक वेळा आयोग नेमण्यात आले आहेत, पण आज पर्यंत या आयोगाने जो जो अहवाल सादर केला त्या द्या आयोगाकडे शासनाने केंद्र शासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मुस्लिम समाजाबरोबर दूझा भाऊ केला आहे असा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव अजिंक्य गायकवाड, तालुका महासचिव ऍड. किरण लोंढे, शहर मुख्य सचिव अक्षय शिखरे, शहर संघटक राहुल नायडू, शहर संघटक बबलू जगताप, शाखाध्यक्ष राजेश ओव्हाळ,प्रवीण भालेराव, खोरावडी चे शंकर जगताप कुरकुंभ चे मयूर कांबळे, अनिकेत जाधव , लिंगाळी शाखेतील यश भालसेन, वानखेडे, कडेठाण चे करण रणधीर, सिद्धार्थ रणधीर, कवठा येथील शक्ती भाऊ लोंढे यांनी देखील उपस्थिती दर्शविली.मुस्लिम समाजाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते मोबीन भाई सय्यद यांनी समाजाच्या वतीने आंदोलनास पाठिंबा दर्शविला.भिमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी वाघमारे, उपाध्यक्ष रीतेश सोनवणे यांनी देखील या आंदोलनास पाठिंबा दर्शविला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *