बारामती बातमी : कोरोना काळात बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा उल्लेखनीय…


कोरोना काळात केलेल्या कामाची पावती म्हणून पाच गावच्या ग्रामपंचायतीने केले कामाचे कौतुक…

डोर्लेवाडी : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र हे तालुक्यात उल्लेखनीय काम करत आहे.याठिकाणी कार्यरत असलेले पती-पत्नी डॉ. वैशाली देवकाते-दडस आणि डॉ.बापूराव दडस हे वैद्यकीय अधिकारी हे शासनाच्या नियमानुसार मुख्यालयातील सरकारी निवासस्थानी राहून रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असल्याने डोर्लेवाडी परिसरातील नागरिकांना वेळेत उपचार देत आहेत.यामुळे डोर्लेवाडी आणि परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.त्यांनी कोरोनाच्या काळात आलेल्या रुग्णांना चांगली सेवा देण्याचे काम केल्याने त्यांना कामाची पावती म्हणून सोनगाव, झारगडवाडी,मेखळी,गुणवडी, मळद ग्रामपंचायतने प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव केला आहे.

कोरोना काळाच्या पूर्वी या आरोग्य केंद्रामध्ये जर महिन्याला १५ ते २० महिलांच्या प्रसूती करण्याचे काम,तसेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया,कोविड निदान,कोविड लसीकरण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे केले आहे.याच प्राथमिक आरोग्य केंद्रात ते त्यांच्या सेवेच्या अगोदर फार कमी प्रमाणात ओपीडी चालत होती मात्र हे दोघे वैद्यकीय अधिकारी आल्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्वरूपच पालटून गेले आहे.या दोघांनी ग्रामपंचायत आणि नागरिकांच्या मदतीने आरोग्य केंद्राच्या आवारात वृक्षारोपण करीत स्वछता ठेवली आहे. रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा दिल्याने या ठिकाणच्या आरोग्य केंद्रातील ओपीडी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चांगल्या सेवेमुळे रुग्णांन दिलासा मिळाला असल्याचे झारगडवाडी चे सरपंच नितीन शेडगे यांनी सांगितले आहे.

बातमी चौकट :

कोरोनाच्या काळात डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या गावांतील रूग्णांन बरोबर इतर गावातील रुग्णांना देखील चांगल्या प्रकारची सेवा देऊन आपले काम येथील वैद्यकीय अधिकारी चांगल्या प्रकारे बजावत आहेत. यामुळे डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा च्या अंतर्गत नसलेल्या मेखळी गावातील नागरिकांनी आणि ग्रामपंचायतीने पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी व बारामती तालुका अधिकारी यांना पत्राद्वारे निवेदन देऊन आमचे गाव या डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रास जोडावे अशी मागणी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *