शेटफळगडे : सुरज सवाणे ( उपसंपादक महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज )
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातला होते,याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काही गोष्टींवर निर्बंध घातले होते,जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढू नये,यामध्ये स्पर्शयात्रा,सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे बंद करण्यात आल्या होत्या,परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत,अशातच शेठफळगडे येथे कोविडचा पहिला डोसाचे लसीकरण १००% होण्याच्या मार्गावर असल्यामुळे या वर्षी १९ आणि २० तारखेला असलेली जनाई देवीची यात्रा शासनाच्या नियमानुसार करण्याचा निर्णय ग्रामपंचायत,यात्रा कमिटी व भिगवण पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी यांनी सभेत मंजूर केला.
पंचक्रोशीतील सर्वात मोठी जत्रा शेठफळगडे येथे दरवर्षी भरली जाते,दोन वर्षे लागोपाठ जत्रा बंद असल्यामुळे या वर्षी गावात व परिसरात मोठया उत्साहात जत्रेची तयारी चालू झाली असून, महत्त्वाच म्हणजे दोन वर्षे यात्रेत खेळणीची दुकाने पाळणे व छोटे छोटे व्यवसायिक जत्रा बंद असल्यामुळें आर्थिक आल्याने परंतु गावात या सगळयांना शासनाच्या नियमांचे पालन करून परवानगी दिली होती.जत्रेत खेळणी पाळणा,ज्युस,खाद्यपदार्थ यांनी गाव गजबजून गेले होते,यानिमित्ताने गावाच्या ग्रामपंचायत तीला आर्थिक हातभार लागला असून,अतिशय आनंदी वातावरणात मंदिरांना लाईटी सजावट करून प्रकाशाने गाव झगमगून गेले होते कोरोना प्रसार वाढू नये लक्षात घेता पारंपरिक विषय म्हणजे तमाशा हा या वर्षी रद्द करण्यात आला होता,तरीपण गावकऱ्यांच्य आनंदात तुसभर ही फरक पडला नाही.
कारण गावातील कुस्तीच्या आखड्याने गावकऱ्यांची व पाहुणे मंडळींची मने जिंकली,दोन वर्षात पहिल्यांदाच या गावात आखाडा भरलेला दिसून आला अतिशय सुंदर व सुनियोजीत या आखाडा चे नियोजन करण्यात यात्रा कमिटी ग्रामपंचायत व कुस्तीप्रेमी यशस्वी झाले प्रचंड मोठया प्रमाणावर कुस्ती प्रेमींचा प्रतिसाद भेटला आश्चर्य याची गोस्ट म्हणजे आखाडा चालू असताना पाऊसाने हजेरी लावून सुद्धा गावकरी तुसभर सुद्धा जागेवरून हलेले नाहीत तीन वाजेपासून ८ वाजेपर्यंत हा आखाडा रंगला. अगदी १०० रुपयांपासून एक लाखापर्यंत कुस्तीचे डाव रंगले होते,सर्वात शेवटची कुस्ती डोळ्यांचे पारणे फेडणारी होती, भारत मदने व रफिक (बाळा) शेख यांच्यात बरोबरीने झाली यात्रेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिगवण पोलीस स्टेशन चे कर्मचारी उपस्थित होते यात्रेसाठी ग्रामपंचायत ,यात्रा कमिटी,भिगवण पोलीस स्टेशन चे अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली आणि कोणतेही गालबोट न लागता यात्रा मोठया आनंदात उत्सवात पार पडली.