पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती व इंदापूर परिसरातील मोटारसायकली चोरणाऱ्या अट्टल चोरट्याचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून आरोपी दत्तात्रय उर्फ बाप्पु भागवत माने वय.३० वर्षे,( रा. शेळगाव,ता. इंदापूर,जि.पुणे ) याला ताब्यात घेत त्याच्या ताब्यातील ५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असल्याची माहिती स्थानील गुन्हे शाखेने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,फरार आरोपीवर कारवाई करण्याचे आदेश मिळाले असता,बारामती विभागात त्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना,मिळालेल्या गोपनीय महितीदारानुसार, दत्तात्रय जाधव कडे होंडा कंपनीची विना नंबर प्लेटची गाडी मिळून आल्याने,त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता, त्याच्याकडील गाडी ही अश्पाक सय्यद (रा.शिंदेनगर,ता.फलटण यांच्या मालकीची असल्याचे निदर्शनास आले.ही गाडी शेळगाव येथील मशिदीपासून चोरीस गेल्याचे समजले.या अनुषंगाने आरोपीकडे अधिक चौकशी केली असता,त्याच्याकडे होंडा कंपनीच्या चार आणि बजाज कंपनीची एक अशा एक लाखांच्या किंमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.यानुसार दत्तात्रय जाधव याला वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी वालचंदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव् देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे,सहाय्यक
फौजदार अनिल काळे,पोलीस हवालदार रविराज कोकरे,
अभिजित एकशिंगे,विजय कांचन,पोलीस नाईक अजय घुले,
स्वप्नील अहिवळे,धिरज जाधव यांनी केलेली आहे.