इंदापूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
लहुजी शक्ती सेना इंदापूर तालुका आयोजित आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंती निमित्त भव्य कबड्डी सामने भवानीनगर येथे आयोजित करण्यात आले होते. पैलवान अजय सोनवणे मित्र परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन झाल्यानंतर सर्व खेळाडूंनी आमच्यासोबत मॅच खेळण्याचा आग्रह भरणे मामांकडे केल्याने भरणे मामांनी क्रीडांगणावर जाऊन कबड्डीचा मला खेळाचा आनंद लुटला.