बारामती बातमी : भिगवण बारामती रोडची झाली दुरवस्था ? याला जबाबदार शासन की ठेकेदार.. प्रवाशांचा संतप्त सवाल..!!


बारामती : सुरज सवाणे (उपसंपादक महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज )

बारामती भिगवण रोड हा भिगवण रोड ला जोडणारा मुख्य रस्ता आहे.बाराही महिने हा रस्ता वर्दळीचा असताना,प्रवाशांना वाहकांना मोठया प्रमाणावर त्रास आणि जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.कायम या त्रासाला वाहतूकदारांना सामोरे जावे लागते.शासनाकडून या रस्त्याला लाखोंचा निधी दिला जातो,तरी सुद्धा या रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली दिसून येत आहे.असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. या रोड ने खड्डा चुकवताना कोणता खड्डा चुकवावा हे मात्र मोठे जिकरीचे आणि जीवघेणे काम झालेले आहे.आणि यामुळेच प्रवाशांच्या नाकी नऊ आले आहे,या रोडला काही ठिकाणी तर फूटापर्यंत खड्डे पडले आहेत,आणि याचमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढलेले असून,आतापर्यंत कितीतरी जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

यामुळे आता अजून किती प्राण जाण्याची वाट प्रशासन बघणार आहे.प्रशासनाला याबाबतीत कधी जाग येणार ? असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे,पाऊस पडल्यानंतर तर या रोडची अवस्था स्विमिंग पूल सारखी होऊन जाते,कारखाने चालू झाले की आणखी मोठया प्रमाणावर वाहतूक होते या मार्गाला एवढा निधी येऊन सुद्धा दुरूस्तीच्या नावाखाली रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी करून “टाळूवरचे लोणी कोण खात आहे ? प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या जीवाशी कोण खेळत आहे ..ठेकेदार की प्रशासन ? असा सवाल नागरिकांना पडलेला आहे.कायम दुरवस्था असलेला हा रोड एकदाच दुरुस्त करावा अशी मागणी आता प्रवाशांकडुन व नागरिकाकडू होत आहे,आणि नाही झाला तर बांधकाम विभागाचे अधिकारी व आणि ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावे,अशी मागणी आता जनसामान्यांकडून होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *