भारतीय पत्रकार(AIJ) संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी तैनुर शेख,तर बारामती तालुका कार्याध्यक्ष पदी विकास कोकरे यांची निवड…!!!


बारामतीत भारतीय पत्रकार संघाच्यावतीने मासिक सभा व कार्यशाळेचे आयोजन…

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

भारतीय पत्रकार (AIJ) संघटना ही महाराष्ट्रातील 22 राज्यात कार्यरत असणारी एकमेव संघटना आहे. तर संघटनाची बारामती तालुका यांच्या वतीने आज शुक्रवार दि.१९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता सुदित हॉटेल बारामती याठिकाणी मासिक सभा व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय पत्रकार संघाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ॲड.कैलास पठारे पाटील हे होते.
दि पुणे लाँयर्स कंझ्युमर को.ऑप.सोसायटी पुणेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक ॲड.पांडुरंग ढोरे पाटील, पुणे वकील बार आसोसियशनचे उपाध्यक्ष व संघाचे कायदेशीर सल्लागार ॲड.योगेश तुपे पाटील, पुणे शहराध्यक्ष देविदास बिनवडे, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश लेंडे, पुरंदर तालुकाध्यक्ष सिकंदर नदाफ, दौंड तालुकाध्यक्ष सुभाष कदम, बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.

उपस्थित पत्रकारांना संघाचे सिकंदर नदाफ, सुभाष कदम , ॲड. योगेश तुपे, देविदास बिनवडे, ॲड. कैलास पठारे पाटील तसेच बारामती तालुका उपाध्यक्ष विनोद गोलांडे आदींनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी भारतीय पत्रकार संघ पुणे जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी तैनुरभाई शेख यांची तर बारामती तालुका कार्याध्यक्षपदी विकास कोकरे यांची सार्थ निवड करण्यात आली.निवडी प्रसंगी नवनिर्वाचित पुणे जिल्हा उपाध्यक्ष शेख यांनी संघ बारामती शहर व परिसरात पत्रकार बांधवांना एकत्र संघ वाढ तसेच जास्तीत जास्त संघामार्फत सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले,
नवनिर्वाचित तालुका कार्याध्यक्ष कोकरे यांनीही भारतीय पत्रकार संघाचे नावलौकिक व संघ वाढीसाठी प्रयत्न असणार.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ पिंगळे, सूत्रसंचालन संदीप बनसोडे यांनी तर आभार सोमनाथ जाधव यांनी मानले.
यावेळी बारामती,दौंड व पुरंदर तालुक्यातील संघांचे मान्यवर पदाधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *