बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती शहरात अवैध गुटखा विक्री प्रकरणी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.पोलिसांनी पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई काल रात्री करण्यात आली.याप्रकरणी केशव सोनबा जाधव व संजय केशव जाधव या ( रा.बारामती ) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,केशव सोनबा जाधव याला अटक करण्यात आले असून,संजय केशव जाधव हा पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी सुनिल महाडिक यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास कारवाई करण्याचे आदेश केले होते,गुन्हे शोध पथकाला मिळालेल्या माहितीनुसार बारामती शहरातील कैकाड गल्ली या ठिकाणी केशव जाधव व संजय जाधव हे राहत्या घराच्या पाठीमागे गुटखा विक्री करत असल्याच्या माहितीच्या आधारे शहानिशा करून छापा टाकला असता,त्या ठिकाणी सुमारे पन्नास हजारांचा विमल पान मसाला व शिमला गुटखा मिळून आला,त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत,जाधव याला ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भा.द.वी कलम ३२८,२७२,२७३,१८८,३४ तसेच अन्न व सुरक्षा मानके कायदा कलम २६(२),(५),२७,३०,(२),३१(१),(२),५९(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्याला न्यायालयात हजर केले असता,चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, युवराज घोडके,संजय जगदाळे, दशरथ कोळेकर,रामचंद शिंदे,अभिजित कांबळे, कल्याण खांडेकर,दशरथ इंगोले,बंडू कोठे, सचिन कोकणे,तुषार चव्हाण, मनोज पवार,अजित राउत,यांनी केली आहे.