धंदे बंद करा अन्यथा तडीपार झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यानव्ये कारवाई करणाऱ्याचा इशारा…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सत्र उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी सुरू केले असून लवकरच बारामती व इंदापूर तालुक्यातील अवैध धंद्यांचा बीमोड करणार असून,या अनुषंगाने आज बारामती तालुक्यातील रेकॉर्डवरील अवैध दारू विक्रीचे गुन्हे दाखल असणाऱ्या चाळीस ते पन्नास लोकांना शहर पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना कडक समन्स देण्यात आली असून,त्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे.
जर पुन्हा अवैद्य दारू विक्री केली तर त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५,५६,५७ अनव्ये तसेच झोपडपट्टी दादा विरोधी कायद्यानव्ये करण्याचे काम प्रभावीपणे करणार असल्याचे देखील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सांगितले यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी काम लावण्यासाठी व इतर मदत करण्याचे आश्वासन देखील पविभागीय पोलिस अधिकारी यांनी दिले असून बारामती तालुक्यातील अवैध धंदे बंद ठेवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
तसेच अवैध धंदे करणाऱ्यांवर अवघ्या दोनच दिवसात पोलिसांनी तब्बल २१ गुन्हे दाखल केली असून २४ जणांवर कारवाई केली आहे. दुसरीकडे रोडरोमिओंवरही पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे,दोन दिवसात तब्बल ३० जणांवर पोलिसांनी कारवाई केली. यापुढील काळात संध्याकाळच्या वेळेस पोलीस पथक शहरात फिरून रोडरोमियो वर कारवाई करणार आहे. अवैद्य दारू,मटका जुगार अमली पदार्थ याविषयीची तक्रार असल्यास माझ्या वैयक्तिक मोबाईल क्रमांक ९०११९६०२०० या क्रमांकावर थेट संपर्क साधावा असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले आहे.