BIG BREAKING : बारामतीमधील नगरसेवकाला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील महिलेवर फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामतीतील उद्योजक व नगरसेवक असलेल्या राजेंद्र बनकर यांना बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील या महिले विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे फसवणुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,सदरची महिला स्टेट बँकेत नोकरी करीत असून,१३ मार्च २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान व जुलै २०२१ मध्ये या महिलेने फिर्यादी बनकर यांना ठेकेदारीच्या कामाकरिता कर्ज प्रकरण मंजूर करून देण्यासाठी व त्यांच्या दोन भाच्यांना बँकेत नोकरी लावून देण्यासाठी म्हणून बनकर यांच्याकडून वेळोवेळी साडे नऊ लाख घेतले.

परंतु या महिलेने त्यांची कर्ज प्रकरण मंजूर केले नाही व त्यांच्या भाच्यांना नोकरीलाही लावले नाही.त्यामुळे बनकर यांनी त्यांना दिलेली रक्कम परत मागितली असता,ती त्यांना परत न देता त्यांच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन बनकर यांची पैसे लाटून आर्थिक फसवणूक केली आहे असे फिर्यादीत म्हणटले आहे.या घटनेचा पुढील तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *