BIG BREAKING : समीर वानखेडे यांच्या अडचणीत होणार वाढ ? जात पडताळणी समितीकडून जात प्रमाणपत्राची पडताळणी सुरू..!!


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यावर प्रश्न उपस्थित केले. तसेच समीर वानखेडे यांचे जात प्रमाणपत्रही बनावट असल्याचा नवाब मलिक यांनी दावा केला होता. याप्रकरणी आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण,जात प्रमाणपत्राची पडताळणी आता सुरू करण्यात आली आहे.समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी वानखेडेंविरोधात रितसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आदात जात पडताळणी समितीकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

या प्रकऱणाशी संबंधित कागदपत्रांची मागणी वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केली आहे.वाशिम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने राहुल डंबाळे यांना पत्र पाठवलं आहे. त्यात म्हटलंय, जिल्हा प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिम या कार्यालयास आपले निवेदन प्राप्त झाले आहे. तसेच भारत सरकारने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या जात दाखल्याची “महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांचे पडताळणीचे विनियमन), अधिनियम २०००” आणि त्यानुसार तयार केलेल्या नियम २०१२ नुसार चौकशीची कारव्यवाही करुन अहवाल सादर करणेबाबत या समिती कार्यालयास आदेशित केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *