बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज…
वडिलोपार्जित शेत जमीनीमध्ये दुरुस्ती वारसनोंद करुन उतारा देण्यासाठी १० हजारांची मागणी करून १० हजार रुपये लाच स्विकारणाऱ्या तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई निंबुत येथील तलाठी कार्यालयात केली.
मधुकर मारुती खोमणे (वय-५८ रा.निंबुत,ता.बारामती,जि.पुणे ) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.याप्रकरणी ४८ वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.तक्रारदार यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे.या जमीनीमध्ये तक्रारदार यांची दुरुस्ती नोंद करायची होती,ही नोंदणी करुन उतारा देण्यासाठी तलाठी मधुकर खोमणे याने १० हजारांची लाच मागितली.
यामध्ये १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचुन तलाठी खोमणे याला तक्रारदार यांच्याकडून लाच घेताना रंगेहाथ पकडले ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव,सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने केली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे राजेश बनसोडे यांनी केली आहे.
१) हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक : १०६४
२) अँटी करप्शन ब्युरो,पुणे दूरध्वनी क्रमांक : ०२०-२६१२२१३४,२६०५०४२३
३) व्हाट्सअँप क्रमांक पुणे -७८७५३३३३३३, व्हाट्सअँप क्रमांक मुंबई : ९९३०९९७७००
४) ई मेलआयडी पुणे [email protected]
५) वेबसाईट : www.acbmaharashtra.gov.in
६) ऑनलाइन ॲप तक्रार : www.acbmaharashtra.net.in