पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात पत्नी स्नेहा हिने पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी व कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा दाखल दाखल करण्यात केला आहे.अभिनेता अनिकेत विश्वासराव सह त्याचे आई वडील यांच्याविरोधात ही कौटुंबीक हिंसाचाराप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्नी स्नेहाने दिलेल्या फिर्यादीनुसार पती अभिनेता अनिकेत विश्वासराव,सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघांविरोधात सून स्नेहा विश्वासराव यांनी तक्रार दाखल केली आहे.
स्नेहा अनिकेत विश्वासराव यांना पती अनिकेत विश्वासराव याने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षाच्या काळात सिनेमा सृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीच नाव मोठ होईल, या भीतीपोटी वेळोवेळी तिला नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे,गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असल्याचे स्नेहाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.याच पार्श्वभूमीवर पत्नी स्नेहा दिलेल्या तक्रारीवरून पती
अभिनेता अनिकेत विश्वासराव सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.