चंद्रपूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचा धक्कादायक प्रकरवसमोर आला आहे. या तरुण कार्यकर्तीला आणि तिच्या साथीदारांना मोपेड चोरीचा प्रकरणात अटक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रपुरात राष्ट्रवादी युवती प्रमुख असलेल्या तरुणीला वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.वैष्णवी देवतळे असे या युवती प्रमुख कार्यकर्तीचे नाव आहे. आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने ती बाईक चोरी करत असल्याचे उघड झाले आहे.तिचे दोन साथीदार विशिष्ट पद्धत वापरून लॉक नसलेल्या मोपेड चोरून त्या विकण्याचा गोरखधंदा ही टोळी करत होती.
एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लॉक नसलेले वाहन सोडून जाणाऱ्या वाहनावर ही टोळी लक्ष ठेवत असे. नेमकी संधी साधून मोपेड चोरी करत होते.त्यानंतर त्या मोपेडला दूरवर पर्यंत ढकलत नेण्यात येत होतं. या टोळीकडून अन्य काही ठिकाणाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीसह मनीष पाल,सौरभ चंदनखेडे अशा तीनही आरोपींना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.