BIG BREAKING : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामती मधील सहयोग निवास्थानासमोर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष व बारामती शहरातील मोठे उद्योजक यांनी एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पुण्यातील एका पीडित महिलेने केला आहे.गेल्या १३ वर्षापासून या महिलेवर या उद्योजकाने व माजी नगराध्यक्ष यांनी वेळोवेळी लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या महिलेने केला आहे.वारंवार पुण्यातील पोलिस ठाण्यात जाऊनही तिला न्याय न मिळाल्याने शेवटी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मधील सहयोग निवास स्थानासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांना या घटनेची माहिती आधीच मिळाल्याने त्या ठिकाणी जात पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेत,तिला आत्मदहना पासून रोखत महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ताब्यात घेतले.

या महिलेने या उद्योजकता विरोधात व माजी उपनगराध्यक्ष च्या विरोधात बिबेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र,पुण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी वारंवार टाळाटाळ करत जाणीपूर्वक त्या पदाधिकाऱ्यांशी व उद्योजकाबरोबर हितसंबंधात जोपासत दुर्लक्ष केले असल्याने,नाइलाजास्तव
तिला मुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती शहरातील सहयोग या निवासस्थानी आत्मदहन करण्यासाठी यावे लागले मात्र याबाबतची माहिती शहर पोलिसांना अगोदरच मिळाल्याने ती महिला पोहचताच,पोलिसांनी तिला ताब्यात घेत या महिलेला आत्मदहनाचा पासून रोखले.तसेच शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी निर्भया पथकाद्वारे या महिलेचे समुपदेशन करीत कायदेशीर मार्गाने लढावे असा यापुढे आपण अशा प्रकारचे पाऊल उचलणार नसल्याचे या महिलेकडून लेखी घेतले घेण्यात आले

या महिलेचा जवाब घेत,पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयातून पुणे शहर आयुक्तांकडे तसा अहवाल बारामती शहर पोलिसांनी बिबेवाडी पोलीस स्टेशनला पाठवुन दिला.याध्ये जर मला न्याय मिळाला नाही,तर मला आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नाही,तसेच ह्या पीडित महिलेने या उद्योजकाने व माजी पदाधिकाऱ्याने बळजबरी करून आपले अश्लील फोटो काढले असून,याद्वारे मला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच मला मारहाण करून पैसे माझ्या हातात देत,माझे पैसे घेतल्यावेळीचे फोटो काढुन माझी बदनामी करण्याचे काम हे उद्योजक व पदाधिकारी करीत असल्याचा आरोप या महिलेने केला आहे….

महिला धोरणाच्या बाबतीत अजित पवार हे अतिशय क्रियाशील असतात,यामुळे आता या महिलेला देखील उपमुख्यमंत्री न्याय मिळवुन देणार का ? तसेच पोलीस प्रशासन उद्योजकांवर तसेच माजी पदाधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *