मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना आदेश..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज..

बारामती तालुक्यातील अनेक गावात राजरोसपणे अवैध धंदे सुरु आहेत.याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक जण दारूबंदी संदर्भात निवेदन देत असतात,उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते,मेखळी या ठिकाणी उद्घाटनासाठी अजित पवार हे आले होते.उद्घाटनानंतर सभेमध्ये एका महिलेने गावात मोठ्या प्रमाणात दारु विक्री सुरु असल्याचे गा-हाणे मांडून कारवाईसाठी त्यांना साकडे घातले.आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळख असलेला राजकीय नेता म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार ओळख आहे,भल्या पहाटे उठून कामाला लागायचं हे त्याचं कामसुत्र..

मात्र कामात कुचराई करणाऱ्यांची ते गय करत नाहीत. पुढचा मागचा विचार न करता थेट कान उघडणी ते करतात.कर्जत जामखेडचे आमदार पुतणे रोहित पवार यांना मास्क वापरासाठी शाब्दिक टोला लगावला होता. यानंतर आता बारामतीतील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले आहे.बारामतीतील एका कार्यक्रमातील जाहीर सभेत त्यांनी”तुम्ही चांगले DYSP म्हणून बारामतीत आणले.” या शब्दांत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे.तर झालं अस की,बारामती तालुक्यातील मेखळी गावात अवैधरित्या दारू विक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलेनं अजित पवारांना निवेदन दिले.

या निवेदनात संबधीत महिलेचा पती दारू पिऊन घरी त्रास देत असल्याची,मारहाण करत असल्याची माहिती देत आपली व्यथा मांडली होती.तसेच दारू बंदी करण्याची विनंतीही केली होती.निवेदन पाहताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांना दारुबंदी बाबतचे आलेले निवेदन देत बारामती तालुक्यात कुठेही दोन नंबरचे धंदे बेकायदेशीर दारू विकली जाते.ती कायमस्वरुपी बंद करा.त्यांच्यावर ताडा लावा, काय कारवाई करायची ती करा.पण बारामती तालुक्यातील कायमस्वरूपी दारु बंद करा असे आदेश अजित पवारांना पोलीस अधिकाऱ्यांना दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *