“NEET परीक्षेत क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी रोवला विजयाचा झेंडा”..!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती येथील क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी ने उज्वल यशाची परंपरा अबाधित राखत यंदाच्या वर्षी २०२१ मध्ये NEET या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे विद्यार्थी अव्वल आले आहेत यामध्ये वर्षा घाडगे या विद्यार्थ्यांनीला सगळ्या विषयात ७२० पैकी ६२२ मार्क्स मिळाले आहेत,तर बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३५५ मार्क मिळाले आहेत. प्रतिक कुंभार याला ७२० पैकी ६०३ मार्क्स मिळाले आहेत तर बायोलॉजी विषयात ३६० पैकी ३५५ मार्क मिळाले.

सोबतच NEET मध्ये सगळ्या विषयात अकॕडमीचे २ विद्यार्थी ६०० मार्कच्या पुढे आहेत तर ८ विद्यार्थी ५४३ मार्कच्या पुढा आहेत व १२ विद्यार्थी ५०० मार्कच्या पुढे आहेत.तसेच १२
विद्यार्थी बायोलॉजी विषयात ३०० मार्कच्या पुढे आहेत.या यशाचे कौतुक करीत असताना क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चे संचालक काळे सर व घाडगे सर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या

पुणे जिल्ह्यामध्ये क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी चा निकाल हा दरवर्षी चांगला लागत आसतो याहीवर्षी ॲकॅडमीने ही यशाची परंपरा अबाधित राखून आपले नाव गुणतालिकेत अव्वल ठेवले आहे यावर्षी NEET या परिक्षेत अकॅडमीच्या विद्यार्थींनी घवघवीत यश मिळवले आहे. विद्यार्थ्यांबरोबरच क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी चे देखील कौतुक पालक करताना पहावयास मिळत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *