बारामती शहर पोलीस ठाण्यात आरोपींची कुंडली तयार करण्याचे काम सुरू..!!
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती शहरात वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेता,वेळचे वेळीच गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी, त्यांना लगाम लागण्यासाठी शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी बारामती शहरांतील गुन्हेगारी रोखण्यासाठी शहर हद्दीतल्या गुन्हेगारांची कुंडली काढण्याचे काम सुरू केले आहे.यामध्ये ज्या ज्या आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात दोन पेक्षा जास्त गुन्हे असतील अशा गुन्हेगारांना त्यांनी ईशारा देत,गुन्हेगारी कराल,तर झोपडपट्टी दादा विरोधी कायदा (एमपीडीए) आणि संघटिक गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का) अंतर्गत,तसेच तडीपार सारख्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
यामध्ये प्रामुख्याने शाळा महाविद्यालयात असतानाच मुले संघटित गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येत आहे, आपण एकत्र राहिल्यास आपल्याला कोणी हातही लावणार नाही,आपण म्हणू ती पूर्व दिशा असणार आहे,असे या मुलांना वाटते.या प्रकाराकडे आई वडिलांचे होणारे दुर्लक्षही यास कारणीभूत ठरते.मुलाने एखादा मोठा गुन्हा केल्यानंतर पालकांचे डोळे उघडतात.मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. चित्रपटातून गुन्हेगारीचे होणारे उद्दात्तीकरण हे देखील संघटित गुन्हेगारीचे एक प्रमुख कारण आहे.तर गुन्हेविषयक मालिका पाहून अनेकांना गुन्हा करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही आपण वेळोवेळी पाहत आलो आहे.
तर शाळा,महाविद्यालयातही अनेकजण प्रेम प्रकरणातून गुन्हेगारीकडे वळल्याचे पाहायला मिळते.यामुळे ही पावले उचल्याचे महाडिक यांनी सांगितले.बारामती शहर मध्ये पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असणाऱ्या आरोपी बरोबर नवीन आरोपींनी जरी गुन्हा केला तरी त्याला सुद्धा याच कायद्याने कारवाई करण्यात येणार आहे.यामुळे सर्वसामान्य माणसांनी गुन्हेगारी व्यक्तीच्या कारवाई मध्ये सामील होऊ नये,आणि आपले भविष्य खराब करून घेऊ नये असेही आवाहन ही बारामती मधील सर्व तरुणांना शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले आहे.