बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क…
बारामती शहरातली लक्ष्मीनगर कासबा या ठिकाणी हातगाड्यावरुन फिरून भाजी विक्री करणाऱ्या फारुख इसाप तांबोळी,वय.५५ वर्ष (रा.लक्ष्मीनगर,कसबा,बारामती) यांच्यावर भाजी विक्री करत असताना,एक विक्षिप्त मनोवृत्तीचा युवक अनिकेत सुरेश शिंदे,वय.२२ वर्ष (रा.लक्ष्मीनगर, बारामती) येत दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने जीवघेणा हल्ला करत पळून गेल्याने त्याच्यावर शहर पोलिसांत जीवघेणा हल्ला केल्या प्रकरणी जखमी फारूक तांबोळी यांच्या पत्नीने बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसब्यातील फारूक तांबोळी हे हातगाड्यावर भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात,असे असताना लक्ष्मीनगर कसबा परिसररात भाजी विक्री करत असताना,कसब्यातील अनिकेत शिंदे याने येत,दारू पिण्यासाठी तांबोळी यांना वीस रुपयांची मागणी केली असता,त्यांनी पैसे देण्यास नकार देताच,या विकृत युवकाने टेबल जवळील पाना डोक्यात घातला, व तेथून पलायन केले.मार लागल्यामुळे फारुख तांबोळी हे त्याठिकाणी बेशुद्ध झाले,त्यांना सुरुवातीला सिल्वर जुबली हॉस्पिटल नंतर निंबाळकर हॉस्पिटल या ठिकाणी तात्काळ दाखल करण्यात आले परंतु ते बेशुद्ध अवस्थेत होते.दवाखान्यात पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी जात तांबोळी यांची प्रकृती पाहणी व घटनास्थळी भेट दिली.त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे या ठिकाणी रवानगी करण्यात आलेली आहे.
आरोपी अनिकेत शिंदे याला शहर पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेत असताना,त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता,त्याच्या डोक्यामध्ये मार लागलेला आहे. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी करून वैद्यकीय तपासणी करून त्याला अटक करण्यात आली असून,अधिक तपास केला असता,अनिकेत शिंदे यांच्या विक्षिप्त वागण्याबद्दल लक्ष्मीनगर भागात अनेक लोकांच्या तक्रारी आहेत,त्याच्यावर खुनाचा प्रयत्न चा गुन्हा दाखल केला आहे.त्याला मा.कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कस्टडी सुनावली आहे.जखमी फारूक तांबोळी यांची आर्थिल परिस्थिती हलाखीची असल्याने,दानशूर व्यक्तीने त्याच्या उपचारासाठी मदत करावी असे पोलिसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे करत आहेत.