झारगडवाडीच्या वाळू तस्करांचा प्रताप.. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या साडे बारा लाखांच्या रस्त्याची लावली वाट..!!


याला जबाबदार कोण ? ग्रामपंचायत की ? महसूल प्रशासन ? की वाळू तस्कर ? बांधकाम विभाग यात लक्ष घालून वाळू वाळू तस्करांपासून रस्त्याला झालेल्या खर्चाची वसुली करणार का ?

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावामध्ये वाळू तस्करांनी हौदोस घातला असून,वाळू तस्करांच्या चोरट्या वाळूच्या बेफाम वाहतुकीमुळे मात्र रस्त्याची पुरती वाट लागली आहे. झारगडवाडी गावातील माने हॉटेल ते स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या दोन महिन्यापूर्वी झाले आहे.मात्र या रस्त्यावर दररोज २० ते ३० ट्रॅक्टर व टिप्पर मधून वाळूची वाहतूक केली जाते आणि यामुळेच जास्त प्रमाणात वाळू भरून वाहतूक करत असल्याने स्मशानभूमी रस्ता हा रस्ता राहिला नसुन,पांणद रस्ता झाला आहे.वाळू तस्कर बेकायदेशीर वाळूची वाहतूक करीत आहेत यामुळे हा दोन महिन्यापूर्वी केलेला रस्ता उखडला आहे.यामुळे आता याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची मागणी झारगडवाडी ग्रामस्थांकडून होत आहे.

झारगडवाडी गावातील माने हॉटेल ते स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रोडची बांधकाम खात्याकडून गेल्या दोन महिन्यांपूर्वी तब्बल १२ लाख ५० हजारांची निविदा निघून,काम पूर्ण झाले होते,मात्र वाळू चोरांनी रस्त्याच्या क्षमतेपेक्षा वाळू वाहतूक केल्याने रस्त्याची पुरती वाट लागलेली आहे.यामुळे या गोष्टीला नक्की जबाबदार कोण ? ग्रामपंचायत देखील या वाळू उखन्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप देखील नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे रस्त्याच्या लागलेल्या वाटेसाठी वाळू चोरांना जबाबदार धरून बांधकाम खाते रस्त्याला झालेल्या खर्चाला वाळू चोरांना जबाबदार धरून हा संपूर्ण रस्ता वाळू चोरांकडून दुरुस्त करून घेणार का ? शासनाने रस्त्यासाठी खर्च केलेल्या साडे बारा लाखांना वाळू चोरांना जबाबदार धरून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करणार का ? याकडे गावाचे लक्ष लागून राहिले आहे.

यामुळे आता ग्रामपंचायत प्रशासन पुढाकार घेऊन वाळू तस्करांवर कारवाई करणार का ? गावातील अवैध वाळू उपसा थांबणार का ? असा प्रश्‍न आता झारगडवाडी ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातो आहे.अनेक दिवसांपासून झारगडवाडी गावात वाळू तस्कर छुप्या पद्धतीने किंवा काही महसूल कर्मचाऱ्यांना व अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद घेऊन वाळूतस्करी करत असल्याच्या चर्चेला देखील उधाण आले आहे.अवैध वाळू व्यवसाया विरोधात तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नाही,प्रशासकीय यंत्रणेकडून गावातील नागरिकांचा आवाज दाबला जात असल्याची देखील चर्चा आहे….

बातमी क्रमशः….(बातमी मागची बातमी)…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *