BIG BREAKING : मुंबई सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या सासऱ्यांच्या कार्यालयावर ईडीचा छापा..!!


औरंगाबाद : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

औरंगाबाद शहरात आज बड्या उद्योजकांविरोधात ईडीने छापे टाकले आहेत.आतापर्यंत नेमक्या कोणत्या उद्योजकांवर ही कारवाई सुरु आहे,हे गोपनीय होते. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,औरंगाबादचे बडे व्यावसायिक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचा खुलासा झाला आहे.तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे.तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे आल्यानंतर ही कारवाई झाल्याची चर्चा जोर धरत आहे.

याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील बियाणे उत्पादक व्यावसायिकावर ही धाड पडली आहे.बियाणे उत्पादक व्यावसायिक पद्माकर मुळे असे त्यांचे नाव असून ते शहरातले सरकारी ठेकेदार आहेत.पद्माकर मुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार कुटुंबियांशी अगदी घनिष्ठ संबंध आहेत. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी मधुकर आण्णा मुळे यांचे हे बंधू आहेत.औरंगाबादमध्ये अजित सीड्स नावाने
पद्माकर मुलांची कंपनी आहे.तसेच सीड्स नावाने पद्माकर मुळे यांची कंपनी आहे.तसेच छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे विश्वस्थ असून त्यांच्या नावावर साखर कारखाना देखील आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *