दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलिनीकरण करावे अशी मागणी दौंड तालुका वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली आहे.दौंड आगार मधील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांकरिता बेमुदत उपोषण सुरू केले आहे.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कामगारांना पाठींबा देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे म्हणाले,ग्रामीण भागातील नागरिकांकरीता एसटी चा मोठा आधार आहे.सरकारने यामध्ये मार्ग काढून कामगारांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.ज्या कामगारांना निलंबित करण्यात आले त्यांना पुन्हा सेवेत घ्यावे.अन्यथा महाविकास आघाडीच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्याचा ईशारा देवून पाठींब्याचे पत्र कामगारांना दिले आहे.
यावेळी एसटी महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावेएस टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पगामध्ये वाढ व्हावी, महागाई भत्ता द्यावा तसेच परिवहनमंत्री अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी,यावेळी करण्यात आली.यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव अजिंक्य गायकवाड शहर उपाध्यक्ष अजगर भाई शेख,शहर मुख्य सचिव अक्षय शिखरे, शहर कार्याध्यक्ष शिवा खारारे,शाखा अध्यक्ष राजेश ओव्हाळ सतीश सोनवणे,लिंगाळी शाखेचे सर्व पदाधिकारी,शुभम वानखेडे,यश भालसेन,भीमक्रांती सेनेचे बंटी वाघमारे रितेश सोनवणे वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी व भिमक्रांती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.