औरंगाबाद : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
एनसीबीचे झोनल डिरेक्टर समीर वानखेडे यांच्या आत्या गुंफाबाई गंगाधर भालेराव यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा,अशी तक्रार औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. नवाब मलिक यांनी सातत्यानं आमच्या कुटुंबाला जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्या आत्यानं केला आहे. गुंफाबाई भालेराव यांनी कुटुंबातील नातेवाईकांचे जातीचे दाखले आणि पूर्ण वंशावळ सोबत जोडले आहेत.मंत्री असून देखील मलिक आमच्या कुटुंबाला मुस्लीम कुटुंब म्हणून हिणवत आहेत.वानखेडे कुटुंबिय नवबौद्ध नसून ते मुस्लीमच आहेत,असं म्हणून परिवाराची बदनामी सुरु केली आहे.त्यामुळे नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे.
जातीयवादी मानसिकता असलेले मलिक यांनी जातीयवादी वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याबर अनुसूचित जाती जमाती कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.समीर वानखेडे यांच्या आत्यांनी दिलेल्या तक्रारीत,आमचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील वरुड कोपा असून आम्हाला सर्वजण नवबौद्ध जातीचे म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे सन्मान देतात.नोकरी आणि कामानिमित्त आमच्यातील काहीजण विशेषतः समीर आणि त्याचे वडिल मुंबई परिसरात राहिलेले आहेत.मलिक यांनी जाणीवपूर्वक मागासवर्गीय असल्यामुळे त्रास देण्यासाठी खोटी माहिती पुरवून वारंवार आरोप केले आहेत.आरोपांमुळे आमच्या कुटुंबियांची मानसिक स्थिती खूप बिघडली आहे.आम्ही मानसिक तणावात शेवटचा उपाय
म्हणून आपल्याकडे तक्रार घेऊन आलो आहोत.असे फिर्यादीत नमूद केले आहे.