दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नक्की चाललय तरी काय ? कार्यकर्त्यांचं नाराजी नाट्य तर पदाधिकाऱ्यांचे राजीनामा!


दौंड : निलेश जाबंले (महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज)

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत धनवे यांचा पक्षावर नाराज होऊन राजीनामा दिला आहे.बारामती लोकसभा मतदासंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटचे मानले जाणारे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे दौंड शहराध्यक्ष प्रशांत धनवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यामुळे सध्या पक्षात काहीच ऑल इज वेल नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर येत आहे.पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते बादशहा शेख यांचा राजीनामा व पुन्हा घर वापसी प्रकरण ताजे असतानाच आता धनवे यांनी तालुका अध्यक्षांकडे आपला राजीनामा देऊन पक्ष्याला आणखीन एक धक्का दिला आहे.

पक्षाने गेल्या अनेक वर्षापासून धनवे यांच्याकडे या पदाची जबाबदारी सोपविली होती परंतु, काही खाजगी अडचणीमुळे आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रामध्ये नमूद केले आहे.आपण नक्की कोणत्या कारणासाठी राजीनामा देत आहोत याबाबत प्रशांत धनवे यांनी सांगितले की, दौंड पोलीस प्रशासन मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनाच ठरवून टार्गेट करीत त्रास देत आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते शहरालगत एका मंगल कार्यालयाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमामध्ये मी पक्षाच्या काही नगरसेवकांबरोबर जात असताना मास्क लावण्यास तयार असताना ही केवळ मास्कचे कारण देत दौंडचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी फक्त मलाच अडवून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. ही घटना पक्षाच्या नगर सेवकांसमोर झाली असताना तसेच मी ही बाब पक्षाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना कळवून देखील याबाबत कोणीच काही दखल घेत नाही,असे दिसत असल्याने मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे असे धनवे यांनी सांगितले.

प्रशांत धनवे गेली अनेक वर्ष पक्ष्याशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत, पक्षासाठी रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलने केली. पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्याला पक्षाच्या पदाधिकार्‍यां समोरच पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली असताना मात्र याविरोधात कोणीच आवाज उठविला नाही, कार्यकर्त्यावर हा अन्याय आहे अशा प्रतिक्रिया पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त केल्या जात आहेत.मागील काही
दिवसांपुर्वी बादशहा शेख यांनी घरवापसीकरण्या अगोदर
पक्षावर केलेल्या आरोपांमध्ये तथ्य होते असेही कार्यकर्ते आता बोलूनही दाखवत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *