मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब धमाका केला आहे.गेल्या काही दिवसांपासून एनसीबी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.असं असताना देवेंद्र फडणवीसांवर देखील आरोप करण्यात आले.या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांवर आरोप केले आहेत.या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी महत्वाचे खुलासे केले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.सलीम जावेदची स्टोरी नाही आणि इंटरव्हलनंतरचा सिनेमाही नाही.फार गंभीर आणि देशाच्या सुरक्षेशी जोडलेला हा मुद्दा आहे,असे फडणवीस म्हणाले.सरदार शहावली खान हे १९९३ चे गुन्हेगार आहेत.यांना जन्मठेपेची शिक्षा झाली असून ते तुरुंगात आहेत.सर्वोच्च न्यायालयाने ती शिक्षा कायम केली आहे.टायगर मेमनच्या नेतृत्वात ते फायरिंगच्या ट्रेनिंगमध्ये सहभागी झाले.
बीएसई आणि पालिकेमध्ये बॉम्ब कुठे ठेवायचे,याची रेकी त्यानी केली होती.टायगर मेमनच्या घरी बॉम्बब्लास्टच्या कारस्थान मांडणीवेळी ते उपस्थित होते. टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये त्यानी आरडीएक्स भरले.साक्षीदारांनी याविषयी साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली,अशी माहिती फडणवीस यांनी दिली.तसेच मोहम्मद अली इशाक पटेल तर्था सलीम पटेल,आर.आर.पाटील इफ्तार पार्टीमध्ये गेले होते तेव्हा त्यांची गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा दोष काही नव्हता.पण ज्या दाऊदच्या माणसासोबत म्हणून त्यांचा फोटो व्हायरल झाला,तो हा सलीम पटेल.तो हसीना पारकरचा बॉडीगार्ड,ड्रायव्हर,फ्रंटमॅनही होता.हसीना पारकरला २००७ मध्ये अटक झाली,तेव्हा सलीम पटेल यालाही अटक झाली.
दाऊदनंतर हसीना पारकरच्या नावाने संपत्ती गोळा केली जायची.सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी करून पैसा गोळा केला जायचा.हा सलीम पटेल जमीन लाटण्याच्या
धंद्यातला सर्वात प्रमुख माणूस होता,असा आरोप देवेंद्र
फडणवीस यांनी केला.कुर्त्यांमध्ये जवळपास तीन एकर जागा केवळ ३० लाखात घेतली. याचा व्यवहार हा २० लाखांचा झाला आहे.मात्र,खरेदी केलेल्या जमिनीतून महिन्याला १ कोटी रुपये भाडे घेत आहेत.या जागेला गोवावाला कंपाऊंड असे म्हटले जाते.गोवावाला म्हणून व्यक्ती होते,त्यांची ही जागा होती. कुर्ल्यात एलबीएस रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी ही जागा आहे.या जमिनीची एक रजिस्ट्री सॉलिडस नावाच्या कंपनीसोबत झाली.मरियमबाई गोवावाला,मुदीरा प्लंबर या दोघांकडून सलीम पटेल हे पॉवर ऑफ ऍटर्नी होल्डर आहे.विक्री करणारा सरदार शहावली खान आहे.म्हणजे या दोघांनी मिळून या जमिनीची विक्री सॉलिडस कंपनीला केली.ही कंपनी नवाब मलिक यांच्या परिवाराची आहे.घेणाऱ्याची सही फराज मलिक नावाच्या व्यक्तीची आहे.या सॉलिडसमध्ये २०१९ मध्ये खुद्द नवाब मलिक देखील होते.आजही त्यांच्या कुटुंबाचे लोक त्यात आहेत,अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.