पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
पुणे जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असुन, एकमेकांच्या नात्यातील दोन महिलांनी पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दिली आहे.राजगड पोलीस ठाण्यात दोन गटातील चार जणांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी चारही जणांना अटक करण्यात आली आहे.पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बलात्काराचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.या घटनेमध्ये विचित्र प्रकार घडला असून,राजगड पोलिसांनी दोन गटातील चार जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
नात्याने एकमेकींच्या चुलत जावा असलेल्या दोन पीडित महिलांनी एकमेकींच्या पतींविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे.यामध्ये एका पीडित महिलेने तिघा जणांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.ही घटना १० ऑक्टोबर २०२१ ते ५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान भोर तालुक्यातील संबंधित पीडित महिलेच्या शेतामध्ये घडल्याचा दावा केला जात आहे.तर दुसऱ्या फिर्यादींने शेतामध्ये ऊसाला पाणी देण्यास गेलेल्या महिलेचा तिच्या चुलत दिराने विनयभंग केल्याचा आरोप आहे.त्यानंतर दोन सहकाऱ्यांसोबत संगनमत करून गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि गोठ्याच्या दरवाजाला आतून कडी लावत आळीपाळीने बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित महिलेने राजगड पोलिसांकडे दिली.पोलिसांनी संबंधित तिघाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तर दुसरीकडे संबंधित आरोपीच्या पत्नीनेही बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून हा गुन्हा फिर्यादी महिलेच्या पतीविरोधात दाखल केला आहे.लॉजवर बलात्कार केल्याचा आरोप यामध्ये ३१ वर्षीय मजुरी करणाऱ्या संबंधित पीडितेने कापूरहोळ येथील एका लॉजवर आणि पीडितेच्या राहत्या घरी ऑक्टोबर २०२० पासून ५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वेळोवेळी जबरदस्तीने बलात्कार केल्याची फिर्याद दिली आहे.या प्रकरणाचा तपास राजगड पोलिस करत असून वरील चारही जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकायांनी दिली आहे.