मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बहुजनांचे नेते भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर याच्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला होता,यावर विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला चढवत गोपीचंद पडळकर यांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली होती जर गोपीचंद पडळकर यांच्या जिवाला काही बरेवाईट झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,असा गर्भित इशारा देखील फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. यानंतर आता रयत क्रांतीचे आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी देखील गोपीचंद पडळकर यांना समर्थन देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वारंवार गोपीचंद पडळकरांना लक्ष करण्यात येत आहे.हल्ला करण्यात येत आहे.मात्र गोपीचंद पडळकर हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असून,ते वारंवार गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अग्रक्रमाने आतापर्यंत लढत आलेले आहेत.
आणि या व्यक्तिमत्वाचा आवाज दाबण्याचा काम खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीकडून सातत्याने होत आहे,असा आरोप सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केला.तसेच आज त्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.राज्य सरकारला ईशारा देताना,सदाभाऊ म्हणाले की,जर गोपीचंद पडळकरांवरती अशाप्रकारे हल्ले करत असाल तर,निश्चितच बहुजन समाज हात बांधून शांत बसणार नाही. आणि याचा मोठ्या संख्येने प्रतिकर करेल.या युद्धामध्ये रस्त्यावरती उतरेल आणि राज्य सरकारने तातडीने त्यांच्या सुरक्षिततेची हमी जबाबदारी घ्यावी.त्यांच्या जीवाला जर काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व त्या त्या पक्षातील नेते जबाबदार असतील.हे आज मी राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो.असा ईशारा देखील राज्यसरकारला दिला.