इस्लामपूर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
आज इस्लामपूर एसटी डेपोमध्ये सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन ३७ आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभावी यासाठी इस्लामपूर डेपोमध्ये एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास माझ्यासोबत कर्मचाऱ्यांनी सुरवात केली आहे. महाराष्ट्रातील ३७ कर्मचाऱ्यांनी शासनामध्ये विलीनीकरण तुटपुंजे व अनियमित वेतन या नैराश्येतुन आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून उपोषणास सुरवात केली.
संवेदना हरवल्यासारखे महाविकास आघाडी सरकार या एसटी कर्मचाऱ्यांच्या विषयाकडे बघत आहे.परंतु राज्य सरकारने दुर्लक्ष केले असले तरी आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ३७ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी हे राज्य सरकार त्यांच्याकडे बघायला तयार नाही हे खूप दुर्दैवी आहे. करती सवरती माणसं जर एसटीला लटकून आत्महत्या करत असतील तर मग आमच्या कुटुंबातल्या भावांसाठी आम्ही एक दिवस दुखवटा पाळू शकत नाही का? एवढं आमचं मन दगडासारखे झाले आहे का? वाळवा तालूका म्हणजे क्रांतिकारकांचा तालुका आहे या मातीतील आपण माणसं कसे काय गप्प बसू शकतो. जर महाविकास आघाडी सरकारने तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न संपवला नाही तर आंदोलन तीव्र करण्यात येईल.अशा ईशारा रयतक्रांतीचे आमदार व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला आहे.