धक्कादायक !वडीलोपार्जीत जमिनीच्या वादातून केले चुलत आजोबाचा खून…!! स्थानिक गुन्हे शाखेने १२ तासांच्या आत दोघांना घेतले ताब्यात…!!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

गावातील वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून चुलत चुलत आजोबांना लोखंडी गजाने, लाकडी दांडक्याने,दगडाने मारहाण करत खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यात निरगुडे येथे घडली आहे.याप्रकरणी सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.ही घटना गुरुवारी (दि.०४) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घडली. मारुती गणपत लकडे (वय.८५ ) वर्ष असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून,इतर पाच आरोपी फरार आहे.

याप्रकरणी मृताचे चुलत नातू बाळू शिवाजी लकडे याने भिगवण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बाळू जाधव याने फिर्यादीत म्हटले की, गुरुवारी संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास निरगुडे लकडेवस्ती येथील मारूती मंदिराच्या समोर निरगुडे गावातील वडीलोपार्जीत गामपंचायती मध्ये येणाऱ्या मिळकती मधील जागेच्या वहीवाटीच्या कारणावरून आरोपी नारायण ज्ञानदेव लकडे, दत्तु ज्ञानदेव लकडे,ज्ञानदेव कृष्णा लकडे,अमर दत्तु लकडे,तन्मय नारायण लकडे,शुभम नारायण लकडे,पारूबाई ज्ञानदेव लकडे, (रा.निरागुडे,लकडेवस्ती,ता. इंदापुर,जि.पुणे ) यांनी जमावाने येऊन चुलत भाऊ असणाऱ्या मारूती गणपत लकडे,त्यांचा मुलगा शिवाजी मारूती लकडे, वाल्मीक शिवाजी लकडे व मला लोखंडी गजाने,लाकडी दांडक्याने दगडाने मारहाण केली,मारहाणीत चुलत आजोबा मारूती गणपत लकडे यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण करून,त्याचा खुन केला आहे.याप्रकरणी सात जणांवर भिगवण पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम.३०२, ३०७,३२४,१४३,१४७,१४८,१४९,५०४, ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला असून,दोघांना ताब्यात घेण्यात भिगवण पोलिसांना व पुणे ग्रामीण स्थानीक गुन्हे शाखेला यश आले असून, गुन्हयातील इतर आरोपींचा शोध घेणे सुरू आहे.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे,स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप येळे,भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पाटील,रूपेश कदम,पोलीस अंमलदार रामदास जाधव,अंकुश माने,महेश उगले,सचिन निकम, सचिन पवार,हसीम मुलाणी, आप्पा भंडलकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल काळे, रविराज कोकरे,काशिनाथ राजापुरे,राजु मोमीण,अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *