फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
फलटण तालुक्याच्या मळशी, आसू हद्दीतील म्हशी चोरून फलटण येथील कत्तल खाण्यामध्ये विक्री करणाऱ्या खाजा हाजी शेख ( रा.आसू,ता. फलटण,जि.सातारा ) याला फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून,गुन्ह्यात चोरीची म्हैस नेण्यासाठी वापलेले वाहन ताब्यात घेत तब्बल ३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.याबाबत फलटण ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आसु गावच्या हद्दीत मळशी येथे गोठयात बांधलेली म्हैस अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याबाबत गुन्हा बरड दुरक्षेत्र पोलीस ठाण्यात दाखल होता.या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू असताना,आसु गावातील स्थनिक नागरिकांनी खाजा शेख याच्यावर संशय व्यक्त केला होता.
त्यानुसार पोलिसांनी म्हैस चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासुन तांत्रिक बाबीचा उपयोग करून,त्याचे मोबाईल लोकेशन प्राप्त करून त्याला ताब्यात घेत,गुन्ह्यात वापरलेले वाहन ताब्यात घेत चौकशी केली असता,त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली,परंतु सीसी टीव्ही फुटेज,मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपीकडे चौकशी केली असता,त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.त्याला
न्यायालयात हजर केले असता,त्याला चार दिवसाची पोलीस कोडठी देण्यात आली आहे.या गुन्हयाचा पुढील तपास पोलीस
हवालदार टिळेकर करीत आहेत.
ही कामगिरी सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल,अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी,फलटण ग्रामीण पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक, अक्षय सोनवणे,सहा.फौजदार सुर्यवंशी,पोलीस हवालदार टिळेकर,साबळे,कर्णे,पोलीस कर्मचारी विरकर,अवघडे यांनी केलेली आहे.