मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
देशभरातील सामान्य जनता महागाईने भरडली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.केंद्र सरकारने प्रति लिटर पेट्रोलमागे ५ रुपये तर प्रति लिटर डिझेलमागे १० रुपये कमी केले आहेत.त्यामुळे वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती आता अनुक्रमे ५ आणि १० रुपयांनी स्वस्त झाल्या आहेत.ही त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने नागरिकांना एक प्रकारची दिवाळी भेट दिल्याची चर्चा सुरु आहे.पेट्रोल-डिझेलचे कमी झालेले दर हे उद्यापासून लागू असतील असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.केंद्र सरकारने पेट्रोलवरच्या एक्साईज टॅक्समध्ये पाच रुपये
तर डिझेसवरच्या एक्साईज टॅक्समध्ये १० रुपये कमी केल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरल्या आहेत.
शेतीचा रबी हंगाम सुरु होणार असल्याने शेतकऱ्यांना मदत म्हणून डिझेलवरच्या एक्साईज टॅक्सवर पेट्रोलच्या दुप्पट म्हणजे १० रुपयांची कमी करण्यात आली आहे.राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरच्या VAT करारातकमी करावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा असं केंद्राने निर्देश दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.देशात गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात रोज वाढ होत होती.त्यामुळे सामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे. देशात पेट्रोलने शंभरी गाठलीच आहे पण अनेक ठिकाणी डिझेलनेही शंभरी पार केल्याचं चित्र आहे.आता केंद्र सरकारच्या या ताज्या निर्णयामुळे नागरिकांना काही प्रमाणात का होईना पण दिलासा मिळाला आहे….!!